महाराष्ट्र शासन कृषी योजना शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने विविध कृषी योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. या योजनांद्वारे माती परीक्षण, दर्जेदार बियाणे, सिंचन सुविधा, आधुनिक शेती यंत्रे, तंत्रज्ञान, आर्थिक सहाय्य, पीक विमा, पीक संरक्षण तसेच शेतीमालाचे विपणन यासंबंधी मदत दिली जाते. शेतीशी संबंधित विविध बाबींमध्ये सहाय्य मिळवण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी योजनांची सविस्तर माहिती जाणून घ्या व त्याचा लाभ घ्या. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना पीएम-किसान योजना या नावाने ही योजना प्रसिद्ध आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीचा आकार विचारात न घेता, स्वत:च्या नावावर लागवडीयोग्य जमीन असलेल्या सर्व शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६००० रूपये इतकी रक्कम प्रदान केली जाते. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नोंदणी करू शकता आणि लाभाची स्थिती तपासू शकता. जास्त तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही संकेतस्थळाला भेट द्या किंवा पीएम किसान अॅप डाउनलोड करा. मदतीसाठी हेल्प डेस्कशी संपर्क साधता येईल आणि या योजनेच्या तपशीलांबद्दलही अधिक जाणून घेता येईल. कृषी तारण कर्ज योजना या योजनेमध्ये शेतकरी म्हणून तुम्ही तुमचे उत्पादन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात ठेवू शकता आणि त्या उत्पादनाच्या किंमतीच्या ७५% रक्कम कर्ज म्हणून मिळवू शकता. बाजारात उत्पादनांचे दर वधारले की तुम्ही तुमचे उत्पादन बाजारात विकू शकता आणि कर्जाची परतफेड करू शकता. तुमच्या उत्पादनाला जास्त चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने ही योजना एक वरदानच आहे.“शासनाच्या विविध योजना योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवणे हे ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे कार्य आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती देऊन नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत सदैव प्रयत्नशील असते.
प्रत्येक गरजू कुटुंबापर्यंत योजनांचा लाभ पोहोचावा, यासाठी पारदर्शक व जबाबदारीने काम करण्याची आमची वचनबद्धता आहे.”

















